पोलीसाचे कोरोनाच्या लढाईसाठी मदतीचे हात सरसावले हेड कॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मुख्यमंत्री निधीला दहा हजारांचे योगदान…

बाळू राऊत प्रतिनिधी

मुंबई : कोरोना व्हायरसचा कहर जगभरात थैमान घालत आहे. जगापुढे एकच प्रश्न या संकटातून मुक्त कसे होता येईल सगळं जग ठप्प झालंय. काहीच दिवसांपूर्वी लोकांनी गजबजलेली आणि घड्याळ्याच्या काट्यावर जगणाऱ्या शहरात शुकशुकाट झाला आहे. जगण्यावरच निर्बंध आलेयत…शाळा, कॉलेज, ऑफिस बंद, प्रवासावर निर्बंध, जमावाने एकत्र येण्यावर बंदी…काही ठिकाणी तर सारंच ‘लॉकडाऊन’सगळ्या जगाने या

आजाराला तोंड द्यायला ही पावलं उचलली आहेत.पण हे सगळं संपणार कधी? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत
देशात अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत सेलिब्रिटी, राजकारणी, सामान्य जनता अनेक कंपन्या पुढे येऊन सढळ हाताने मदत करत आहेत.

त्यात ज्यामुळे आपण घरी व्यवस्थित झोपू शकतो २४ तास नोकरी करणारे आमचे पोलीस बांधव कसे बरे मागे राहतील ऊन असो, वारा असो, पाऊस असो, कोणतेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणारे पोलीस बांधव कधीच कमी पडत नाहीत

अनेक वेळा पोलीस बांधावाना अपमानास्पद वागणूक देखील दिली जाते. तरी या सर्व बाबी बाजूला ठेऊन प्रामाणिक काम करणारे पोलीस सतत वेळ काळ पाहून आपले कर्तव्य बजावत असतात.

डोंगरी पोलीस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मुख्यमंत्री निधीला १०,००० योगदान केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचं कौतुक केलं व आभार मानले असे ट्विट आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देखील त्यांनी शेअर केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here