पुण्यात २४ तासात २ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू…बळींची संख्या ४ वर…

डेस्क न्यूज – गेल्या २४ तासात विक्रमी वाढ झाल्याने, देशभरातील करोनाबाधितांचा आकडा शनिवारी ३ हजारांच्या पलीकडे गेला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढत चालली आहे. करोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये एकाच दिवसात आतापर्यंत सर्वाधिक, म्हणजे ५२५ इतकी वाढ झाल्याने ही एकूण संख्या ३०७२ इतकी झाली. याच कालावधीत आणखी १३ जण मृत्यूमुखी पडल्यामुळे करोनाबळींची संख्या ७५ झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

पुण्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. लक्ष्मीनगर येरवडा येथील एका ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेचा ससूनमध्ये मृत्यू झाला. तिला काल रुग्णालयात दाखल केले होते, पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तिचा आज अहवाल पॉझिटिव्ह आला. अजून एका ५२ वर्षीय पुरुषाचा देखील ससूनमध्ये काल (ता.०४) दुपारी मृत्यू झाला आहे. कासेवाडी भवानी पेठ येथील हा रहिवाशी आहे. त्याला रक्तदाबचा त्रास होता, अशी माहिती ससून रुग्णलायचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवलवाले यांनी दिली.

येरवडा भागातील लक्ष्मीनगर येथील एका ६० वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास झाल्यानंतर ससून रुग्णालयात काल दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचे निदान झालेल्यांपैकी हा चौथा मृत्यू आहे.

या महिलेला काही दिवसांपूर्वी डॅा. नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिची चाचणी घेतली असता तो अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले होता. मात्र, प्रकृती बिघडल्याने तिला काल ससूनला दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, तिचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here