पुण्यस्मरण | विदर्भवीर कै.स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज…

“मी जगेन तर विदर्भासाठी व मरेन तरी विदर्भासाठी” अशी खुणगाठ बांधून गगनभेदी घोषणा करणारे आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संघर्ष करणारे, कट्टर विदर्भवादी नेते, विदर्भवीर, अहेरी इस्टेटचे दिवंगत राजे, शिक्षण महर्षी, माजी खासदार कैलासवासी स्व. राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या आजच्या 23 व्या पुण्यस्मरणार्थ स्मृतींना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!

कैलासवासी स्व. राजे विश्वेश्वरराव महाराज आयुष्याच्या व श्वासाच्या अखेरच्या क्षणापर्यंत नागपूर राजधानीसह स्वतंत्र विदर्भ राज्याकरिता एकाकी झुंज दिले.
कै.स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज यांना राजकीय जीवनात वेगवेगळे व मोठं मोठे प्रलोभने वेगवेगळ्या पक्षातून देण्यात आले पण देत असाल तर वेगळे विदर्भ द्या! अन्यथा चालते व्हा असे म्हणत “ऑफरला” अक्षरशः धुळकावून लावले.
इतकेच नव्हे तर डिसेंबर 1995 ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर ते नागपूर असा पायदळ मोर्चा काढून वेगळ्या विदर्भाची मागणी तीव्र केले आणि राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष वेधून घेतले.

विदर्भासाठी लढतांना विदर्भातील अनेक नेत्यांनी स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज यांची साथ घेतले व अर्ध्यावरच अनेक नेत्यांनी साथ सोडून दिले पण मोठ्या हिंम्मतीने व धैर्याने महाराज एकाकी लढा दिले. साथ सोडून दिले व राजकीय पोळ्या शेकून घेतले म्हणून त्यांच्यावर कधी टीकेची झोड उडविले नाही.
वेगळ्या विदर्भाशिवाय पूर्व विदर्भातील म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील भाग विकसित होणार नाही व या भागात वने व मुबलक प्रमाणात खनिज समृद्धी व साहित्य सामुग्री असल्याने या भागातील जीवनमान व आर्थिकमान उंचावेल हे हेरूनच स्व.विश्वेश्वरराव महाराजांनी वेगळ्या विदर्भासाठी आग्रही होते.

सोबतच शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन पिताश्री स्व. राजे धर्मराव महाराज यांच्या नावाने सन 1958 मध्ये राजे धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना करून अहेरी उपविभागात शिक्षणाचे जाळे पसरविले. जंगलव्याप्त, आदिवासीबहुल, दुर्गम भागात विद्यादानाचे खऱ्या अर्थाने महान कार्य स्व.राजे विश्वेश्वरराव महाराजांनी केले म्हणूच “शिक्षण महर्षी” ही उपाधी महाराजांसाठी शोभून दिसते.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासोबतच स्व. महाराजांना क्रीडा,कला, सांस्कृतिक क्षेत्रातही मोठी आवड होती.जनजागृतीसाठी तर महाराज नेहमी अग्रेसर असायचे तितकेच पर्यावरण प्रेमीही व आदिवासींचे तारणहार होते.
कैलासवासी स्व.राजे विश्वेश्वरराव महाराजांचे कार्याचा आलेख मोठे व महान असून आजही अविस्मरणीय आहेत आज स्व.महाराजांचे 23 वे पुण्यस्मरण असून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली! जय विदर्भ!!

सौ. जयश्री खोंडे,अहेरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here