डेस्क न्यूज –
ही मोठी लढाई मी एकटा कसा लढणार, किती दिवस असे घालवायचे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल, पण आपण एकटे नाही, १३० कोटी देशवासीयांची सामूहिक शक्ती प्रत्येकाच्या सोबत आहे त्यामुळे काळजीचं कोणतंही कारण नाही, असं मोदी म्हणाले.
कोरोनाच्या अंधाराला दूर करण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातल्या सगळ्या लाईट बंद करा आणि घराच्या दरावाजासमोर किंवा बाल्कनीत उभा राहून ९ मिनिटे मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅशलाईट जाळा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. यावेळी अजिबात गर्दी होणार नाही किंबहुना सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं सांगायला ते विसरले नाहीत.
अंधकार दूर करण्यासाठी प्रकाशाचं तेज सर्वत्र पोहोचवायचं आहे. कोरोनाच्या संकटाच्या अंधकाराला आव्हान द्यायचं आहे. प्रशाच्या उर्जेची अनूभुती या कोरोनामय अंधकाराला द्यायची आहे, असं मोदी म्हणाले.