परप्रांतीयांना दिला भंडाराकरांनी मदतीचा हात…जिल्हा पोलिस अधीक्षक व पोलिस निरीक्षक भंडारा यांचे सुचनेचे केले पालन…

भंडारा : देशात कोरोना विषाणूने हळूहळू पाय पसरविणे सुरू केले आहे. देश लॉकडाऊन करण्यात आल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शहरातील मजूर आता मिळेल त्या साधनाने किंवा पायदळ गावाकडे निघाले आहे.

छत्तीसगढचे काही नागरिक पायदळ भंडारा शहरात पोहचले. ही माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय मते, उमेश मोहतुरे यांनी त्यांना मदत केली. यात पोलीस प्रशासनानेही यथोचित सहकार्य केले.

◆ बालाघाट, जबलपूर येथील मजूर मागील काही वर्षांपासून कामानिमित्त शहरात होती. मात्र, कोरोनामुळे देशात अचानक लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे हाताला काम नसल्याने हे मजूर गावाकडे परत निघाले आहे. मात्र, कुठलेही वाहन मिळाले नसल्याने हे मजूर पायदळचं निघाले असता, भंडाऱ्यातील शास्त्री चौकात पोहचले.

◆ मागील चार – पाच दिवसांपासून हे सर्व पायदळ मार्गक्रमण करून भंडाऱ्यात पोहचल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय मते, उमेश मोहतुरे यांना मिळाली. त्यांनी अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने या नागरिकांच्या नास्ता व चहाची व्यवस्था केली.

त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे आणि भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक लोकेश कणसे यांच्या सूचनेनुसार व सहकार्याने दोन वाहनाची व्यवस्था करून देत त्यांना त्यांच्या गावाला पोहचवून दिले. भंडाराकरांनी केलेल्या सहकार्याने सर्व मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.

वाहनात बसताना सर्वांनी भंडाराकरांचे आभार मानून रजा घेतली. सामाजिक कार्यकर्ते संजय मते, उमेश मोहतुरे, भंडारा पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस कर्मचारी राजू हाके, ज्ञानेश्वर आळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्यासोबत संदिप मारबते, अण्णाजी विकार शेख, गोलु लांजेवार, अजित ब्राम्हनकर, संजय पान मंदिर व त्यांचे सहकारी मित्र यांनी चहा, बिस्केटची व्यवस्था केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here