पंतप्रधानांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी ?…

डेस्क न्यूज – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अगदी जवळचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्हाईट हाउस मध्ये पत्रकारांना संबोधित करताना भारताबद्दल जर तर ची भाषा केली. कोरोना महामारीने अमेरिकेत थैमान घातलेलं असून तीन लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेला करोनाचा खूप मोठा फटका बसला आहे. करोनावर लस मिळावी यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. फक्त अमेरिकाच नाही तर जगभरातील वैज्ञानिक यासाठी प्रयत्न करत आहेत.

जगभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७३ हजार ७५० वर पोहोचली आहे. दरम्यान जगभरात १३ लाख २८ हजार १५० जणांना करोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन लाख लोकांना उपचार करुन घरी पाठवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे भारतात ४७७८ लोकांना करोनाची लागण झाली असून मृतांची संख्या १३६ वर पोहोचली आहे.

अमेरिका करोनावर उपचार करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा वापर करण्यावर भर देत आहे. भारतात मलेरिया या रोगाशी लढण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन हे औषध प्रभावी ठरलं होतं.

भारतात आजही अनेक लोकांना मलेरिया हा आजार होत असतो, यासाठी भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात या औषधाचं उत्पादन करत असतात. हेच औषध सध्याच्या घडीला करोनावर मात करण्यासाठी काही प्रमाणात प्रभावी ठरत असल्यामुळे, हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनच्या मागणीत वाढ झालेली आहे. यामुळेच डोनाल्ड ट्रम्प भारताकडे यासाठी विनंती करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे मदत मागितली असून यावेळी त्यांनी धमकीवजा इशाराही दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. यावेळी जर भारताने मदत नाही केली तर काही हरकत नाही, पण मग त्यांनी आमच्याकडूनही तशी अपेक्षा ठेवण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. 

आणि हा धमकीवजा इशारा भारताने हो म्हटल्यानंतर दिल्यामुळे ट्रमच्या या धमकीवर भलेमोठे प्रश्नचिन्ह लागून मोदींनी चोख अन् भारतीय संस्कृतीला अनुसरून समजूतदार उत्तर देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here