मूल (चंद्रपूर)
कोरोना विषाणू संसर्ग गंभीर वळण घेत असताना जिल्हा प्रशासन खंबीर पणे उपाय
योजना राबवित आहे.मात्र काही प्रशासकीय अधिकारी या जिवघेण्या स्थितीतही गंभीर नसल्याने कर्मचारी वर्गाचा शहाणपणा नागरिकांना मोठा अंगलट आल्याची घटना
आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभा मतदारसंघातील मूल घडली आहे.मूल शहरातील चंद्रपूर..गडचिरोली महामार्गावरील गांधी चौकात दि.३० माच॔ ला सांयकाळी लागलेले निर्जंतुकीकरण गेट अखेर १एपिलला काढून टाकण्याची नामुष्की न.प.वर आली .
मात्र या काळात या गेट मधून गेलेल्या अंदाजे ७०० वर वाहनचालकांना इन्फेंक्शन सुरू झाल्याचे वुत्त पसरताच आरोपी ठरलेल्या न.प. प्रशासनाने चुपचाप गेटसह पोबारा केल्याचे खळबळजनक वुत्त आहे. दि.३१माच॔ ला न.प.ने लावलेल्या या निर्जंतुकीकरण गेट मधून गेलेल्या व २० सेकंद फवारणीत थांबलेल्या जवळपास
सर्वांनाच डोळ्याची आग, शरीरात खाज,सदी॔ अशा इंन्फेक्शनचा सामना करावा लागला.
लोकांची वर्दळ थांबविण्याकरीता तर असा जिवघेणा गेम न.प.पशाशनाने खेळला नसेल?अशीही शंका व्यक्त होऊ लागली असली तरी मात्र कुठलेही काम गंभीरपणे न करणे या न.प.च्या सवयीमुळेच हा गंभीर प्रकार घडला असावा असे जाणकार सांगतात.
चंद्रपूर जिल्हयात सध्यातरी एकही कोरोना संसग॔ रूग्ण नसला तरी मात्र सावधान राहणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.मात्र ईथे तर अक्षरशः जनतेच्या जिवाशी खेळणारा हा
प्रकार अक्षम्य असून न.प.मुख्याधिकारी यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे अशी मागणी होऊ लागली आहे.