गडचिरोली: जिल्ह्यातील तीन नागरिकांनी गेल्या महिन्यात निजामुद्दीन स्टेशन व निजामुद्दीन रेल्वेने प्रवास केल्याने प्रशासनाकडून त्यांना त्याच वेळी होम क्वारंटाइन करण्यात आले होते.
याबाबत त्यांचे नमुने निजामुद्दीन मरकल या पार्श्वभूमीवर तीन दिवसापूर्वी तपासणी करीता देण्यात आले होते. काल सायंकाळी उशिरा त्यांचे नमुने अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत.
नागरिकांना सुचित करण्यात येत आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही बाहेर प्रवास केला असेल तर प्रशासनाला वेळीच माहिती द्या.
संसर्गापासून दूर राहण्यासाठी बाहेरून आलेल्यांनी विलग राहणे हा एकमेव पर्याय आहे.