निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीत गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क करा…अन्यथा कठोर कारवाई…

डेस्क न्यूज – गेल्या महिन्यात दिल्लीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीकडून एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राजधानी दिल्लीला तबलिगी मकरजला जे गेले होते, त्यांनी ताबडतोब मुंबई महापालिकेशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. जे कुणी असं करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.

दिल्लीला तबलिगी जमात मध्ये गेलेल्या लोकांमुळे मुंबई आणि राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं चित्र समोर आले आहे. एकट्या मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा पाचशेच्या जवळ गेला आहे. दिवसांगणिक ही आकडेवारी वाढतच आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका करोनाग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार करीत आहे.

मरकज येथे गेलेल्या नागरिकांमुळे इतरांना करोना व्हायरस लागण होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने ट्विट करत माहिती देण्याचं आवाहन केले आहे. जर प्रवासाची माहिती दिली नाही तर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पालिकेनं स्पष्ट केले आहे. करोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी रूग्णांची अथवा रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती मिळवून त्यांना विलगीकरण कक्षात अथवा आयसोलेशनमध्ये ठेवणं हा एकमेव उपाय आहे.त्यासाठी आपल्या भागातील जमात मध्ये गेलेल्यांची माहिती द्या अस बीएमसी ने कळविले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here