निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या तिघांना सुट्टी…आयसोलेशन वॉर्डमध्ये ५३ जण दाखल…

सचिन येवले/यवतमाळ-

यवतमाळ, दि. ६ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच त्यांना पुढील 14 दिवस आरोग्य यंत्रणेच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येईल, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. या तिघांचे रिपोर्ट रविवारी रात्री उशिरा वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले होते.

आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत एकूण 53 जण दाखल आहेत. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांचे रिपोर्ट अप्राप्त आहेत. आयसोलेशन वॉर्डात शनिवारपर्यंत दाखल असलेल्या 51 जणांपैकी 44 नागरिक हे दिल्ली येथील संमेलनाशी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष संपर्कात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. याव्यतिरिक्त दाखल असलेल्या इतर सात जणांपैकी तिघांचे निगेटिव्ह रिपोर्टस दि. 5 रोजी रात्री वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. त्यामुळे या तिघांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात गृह विलगीकरणात निगराणीखाली असलेल्या नागरिकांची संख्या आता 90 झाली आहे. बाहेरून आलेल्या किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रणेशी संपर्क करावा. जेणेकरून त्यांच्यावर पुढील उपचार करणे सोयीचे होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here