शरद नागदेवे
रामटेक -हिवरा बाजार – नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दि.३०मार्च रोजी रामटेक तालुक्यातील हिवरा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.
बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांचे विलिगीकरण करण्याबाबत, प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधीसाठा उपलब्ध ठेवने, परिसरात स्वच्छतेबाबत विशेष लक्ष लक्ष देण्यात यावे,
बाहेरगावातून आलेल्या नागरिकांची सूची तयार करून त्यांची माहिती ठेवण्यात यावी,त्यांचावर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.दुरध्वनि द्वारे त्यांची विचारपूस करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शांताबाई कुंमरे, रामटेक पंचायत समितीच्या अध्यक्ष ठाकरे, हिवरा बाजारचे सरपंच गणेश चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन नाईकवार,प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राजक्ता गुप्ता, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश गणवीर, आरोग्य साहाय्यक धुर्वे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.