शरद नागदेवे
नागपूर – नागपूरात कोरोनामुळे ६८ वर्षीय वूद्धाचा मूत्यु झाला आहे.नागपुरात कोरोनामुळे झालेला हा पहिलाच मूत्यू आहे.मूत्यू झालेला व्यक्ती हा संतरजीपुरा क्षेत्रातील असल्याची माहिती आहे.
या रूग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .रुग्णालयात रूग्णाला दाखल केल्यापासून कुठलाही नातेवाईक त्याला भेटायला आला नव्हता.त्याचा मुत्यू झाला समजल्यानंतर सुध्दा नातेवाईक आले नाहीत.
पोलीसांनसह आरोग्य कर्मचारी रुग्णचा संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहेत.
रूग्ण सतरंजीपुरा परिसरातील असल्यामुळे सतरंजीपुरा भाग सील करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.सतरंजीपुरा हा नागपूर शहराचा मध्यभागी असून गजबजलेला परिसर आहे.तीथे लोकांची नेहमी वर्दळ असते.खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सिल करण्याचि निर्णय घेण्यात आला आहे.रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. लोकांनी खबरदारी म्हणुन शासनाचा आदेशाचे पालन करावे व महत्त्वाचा कामाशिवाय बाहेर पडु नये.