नांदेड मनपा आयुक्तपदी सुनील लहाने यांची नियुक्ती
महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मीरा भाईंदर महानगरपालिचे अतिरिक्त आयुक्त सुनील लहाने यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश शासनाचे उपसचिव कैलास बधान यांनी दिले आहेत .
गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त पद रिक्त होते.त्यामुळे शहरवासीयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अखेर नगर विकास विभागाने प्रशासकीय कारणास्तव राज्यपाल यांच्या आदेशानुसार मीरा भाईंदर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील लहाने यांची नेमणूक नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी केली आहे.
तसेच त्यांना कार्यरत पदावरून दिनांक 3 एप्रिल रोजी कार्यमुक्त केले आहे. लहाने यांनी तात्काळ नांदेड महानगरपालिकेचा कार्यभार स्वीकारून शासनास अहवाल सादर करावा असे आदेश शासनाचे उपसचिव कैलास बधान यांनी दिले आहेत.