नांदेड भाजप महानगरच्यावतीने निरोगी आपला परिसर उपक्रम…

महेंद्र गायकवाड
नांदेड
भाजपा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने सर्व जिल्ह्यामध्ये आपत्कालीन यंत्रणा कार्याविन्त करण्यात आली असून भाजपा नांदेड महानगर तर्फे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली “निरोगी आपला परिसर” हा उपक्रम सुरु करण्यात आला असून भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी शिवशक्तीनगर मिलरोड नांदेड या परिसरातील सर्व घरी जावून अल्टरासाऊन्ड थर्मामिटरने लहान मोठया सर्वांची तपासणी केली असता एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्यामुळे शिवशक्तीनगरचे रहिवाशी चिंतामुक्त झाले आहेत.

आचारसंहिते मध्ये सामाजिक कार्य करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या शिफारसी वरून दिलीप ठाकूर यांना पोलीस प्रशासनाने अत्यावश सेवा ओळखपत्र दिले आहे. त्यामुळे त्यांना आचारसंहिते मध्ये घरोघरी जाणे शक्य झाले. मास्क व हातमोजे परिधान करून ठाकूर यांनी ते रहात असलेल्या6 शिवशक्तीनगर मधील एका वर्ष्याच्या तान्हया बाळापासून ते नव्वद वर्ष्या पर्यंतच्या सर्व नागरिकांची तपासणी केली.कोरोना मुळे भयभीत झालेले नागरिक सतत तणावाखाली वावरत होते.तपासणी होऊन निरोगी असल्याचे आढळून आल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला.कोरोना ची लागण झाली नसल्याचे पाहून बिनधास्त न फिरता आपल्या घरातच आचारसंहिता संपेपर्यंत नागरिकांनी राहून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे सावधगिरी बाळगावी असे ॲड. ठाकूर प्रत्येकाला आवर्जून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here