महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यभर कलम 144 फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सदर संचारबंदी व लॉक डाऊन च्या अनुषंगाने लोकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे एक सुसज्ज नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, येथील दूरध्वनी क्रमांक 02462- 234720 व हेल्पलाइन क्रमांक 1091 व 100 क्रमांकाच्या पाच लाईन सुरु करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांचे पोलिसांसोबत सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या, तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुविधा व्हावी. याकरिता नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे व्हाट्सअप मेसेज सेवा सुरू करण्यात आलेली आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असते त्याचा क्रमांक 88888 89255 हा आहे. नागरिकांना या क्रमांकावर माहिती द्यावी व जिल्ह्यातील सर्व नागरिकानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.