नांदेडमध्ये ॲड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून आहारसंहितेतील लॉयन्सचा डब्बा सामाजिक उपक्रम…

महेंद्र गायकवाड

नांदेड – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने “आचारसंहितील लॉयन्सचा डबा ” या उपक्रमाचा शुभारंभ खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नांदेड रेल्वे स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना जेवणाचे डबे देऊन करण्यात आला.

यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, लॉयन्स सेंट्रल अध्यक्ष लॉ. डॉ. विजय भारतीया, सचिव लॉ. डॉ. मोहन चव्हाण, उपाध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, सफायर चे कोषाध्यक्ष लॉ. संदीप अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.कोलकाता येथील अडकलेले 14 प्रवासी, रेल्वे स्टेशन परिसरात बंदोबस्ताला असलेले पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक,

अपंग व गरजू निराधार यांना मान्यवरांच्या हस्ते पोळी व भाजी असलेले डबे देण्यात आले.
नऊ वर्ष भाऊचा डबा व दोन वर्ष्यापासून लॉयन्सचा डबा नियमित देत असल्यामुळे अनेकांनी या नवीन उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामध्ये लॉयन्स क्लब नांदेड सफायरच्या सर्व सदस्यांनी मिळून 1000 डबे दिले आहेत.मराठा वीज कर्मचारी संघटना नांदेड तर्फे 400 डबे देण्यात येणार आहेत.

श्रीमती पद्मावती विश्वनाथ अनंतवार यांनी तीनशे डबे दिले.प्रत्येकी 200 डबे देणाऱ्या मध्ये लॉ. सुभाष बंग, लॉ. संदिप काला, आदित्य बालकिशन जाजू, रघुनाथ गणपतराव चक्रवार, हर्षल पटेल यांचा समावेश आहे. लॉ.अद्वैत उंबरकर ,लॉ. ज्ञानेश्वर महाजन, विकास लव्हेकर, लॉ.मयूर दिलीप मोदी, लॉ. प्रा. दीपक बच्चेवार, लॉ. व्यंकटेश पारसेवार , सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी.एच.अग्रवाल, अखिल गुप्ता, गणेश बाळकृष्ण महाजन, राघव गणपतराव दंडे, मनोहर देवणे, सौ.नमिता रमेश पुरणाले यांनी प्रत्येकी शंभर डबे दिले आहेत. याशिवाय प्रत्येकी पन्नास डबे देण्यासाठी लॉ.अजय राठी ,लॉ. महेंद्र चव्हाण, लॉ. राम दरक, लॉ.अजय बाहेती ,लॉ. अनिल लड्डा,लॉ.अजय राठी ,लॉ. निकेश मुनोत, लॉ. संदिप अग्रवाल, लॉ. पी. दांडेगावकर, लॉ. अमर धूत, एस.एन.सिद्धान्ती यांनी संमती दिली आहे.

समाजमाध्यमातून आवाहन केल्या नंतर 118 विद्यार्थी, 17 पोलीस कर्मचारी, 8 आरोग्य कर्मचारी,6 शिकाऊ डॉक्टर, 5 नर्सेस, 6 मनपा कर्मचारी, 3 अपंग व्यक्ती यांनी डबा देण्यासाठी मागणी केल्यामुळे स्वयंसेवक राजेशसिंह ठाकूर व मन्मथ स्वामी यांनी प्रत्येकाला घरपोच लॉयन्सचा डबा पोहचती केला.पहिल्या दिवशी 240 डबे दिले असून आचारसंहिता संपेपर्यंत दररोज लॉयन्सचा डबा वितरीत करण्यात येणार असल्यामुळे डबे देणाऱ्या अन्नदात्यांनी आणि डब्याची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांनी व इतर गरजवंतांनी लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या सदस्यांनी संपर्क साधावा असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here