नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन यांची नायगाव कापूस खरेदी केंद्रास भेट…

महेंद्र गायकवाड
नांदेड

जिल्हाधिकारी यांनी नायगाव येथील कापूस खरेदी केंद्रामध्ये भेट देऊन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी श्री शरद झाडके, नायगाव कापूस खरेदी केंद्राचे मालक संचालक श्री डी बी पाटील होटाळकर, कुंटूर येथील येथील कापूस खरेदी केंद्राचे संचालक श्री राजेश कुंटूरकर रुपेश कुंटूरकर तसेच सीसीसी आय चे अधिकारी श्री सोनवणे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव चे सचिव श्री कदम यांची बैठक घेतली.

या बैठकीमध्ये गाव निहाय कापूस खरेदी करण्यासाठी शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी तलाठी यांना सुचित करण्यात आले तसेच कापूस खरेदी केंद्र सुरू करण्या संदर्भामध्ये बीसीसीआयचे खरेदी अधिकारी श्री सोनवणे यांनी सद्यस्थितीत कोरोना संदर्भात उपस्थित झालेल्या परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकारी यांना सांगितल्या

यावर जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी सर्व समस्या सोडविल्या जातील ,आपण कापूस खरेदी करण्याची तयारी करावी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाहीअसे नियोजन करावे, अडचणी आल्यास पोलीस व महसूल प्रशासन आपणास सर्वतोपरी सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here