नवसाला पावणारी दहिगाव येथील हिंगळा भवानी मातेची यात्रा कोरोना मुळे रद्द…

दहिगाव प्रतिनिधी – अनिल उर्फ अण्णा इंगोले

सालाबादप्रमाणे याही वर्षी येणारी यात्रा ही कोरोना संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय समिति ने घेतला आहे. चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीनिमित्त तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथे साजरी होणारी हिंगळा भवानी देवीची यात्रा जिल्ह्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली असल्याचे मंदिर प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

समूह संसर्गाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने
एकवीस दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत ८एप्रिलला होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.

तसेच यादिवशी मंदिर सुद्धा बंद राहील तरी भक्तांनी यादिवशी मंदिरात येणे टाळून घरात राहूनच कोरोना प्रतिबंधासाठी प्रार्थना करा असे मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने कळविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here