धामोरी येथील शेतामधील घरास आग…तिन लाखाचे वर नुकसान…

पी.एन.बोळे,जामठी बु.

जामठी बु. ( प्रतिनिधी ) येथून जवळच असलेल्या धामोरी येथे पंजाबराव सातंगे यांचे मालकीचे शेतामध्ये बांधलेल्या ( शेतमाल ठेवण्याकरीता ) घराला आग लागली. व त्यामध्ये जवळपास पन्नास क्विंटल कापूस चार क्विंटल सोयाबीन, दोन क्विंटल तुर, चार ताडपत्री, व इतर वस्तू जळून खाक झाल्यात. कापूस साठ क्विंटल होता परंतु आग लवकर आटोक्यात आणली गेली त्यामुळे बऱ्याच वस्तू व काही कापूस बचावला. नुकसान तिन लाखाचे वर आहे.
दि. ४ ला रात्री च्या दरम्यान ही आग लागली असावी.

दि. ५ ला सकाळी 8 वा. आग लागली हे लक्षात येताच धामोरी येथील गावकरी आग विझविण्यासाठी धावून आलेत. अग्निशमन दलाची गाडी सुद्धा आली. परंतु तोपर्यंत धामोरी येथील गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती. .

आग कशामुळे लागली हे कळले नाही. माना पोलीस स्टेशन चे ठाणेदार संजय खंडारे व सहकारी यांनी भेट देऊन चौकशी करुन घटनेची नोंद करण्यात आली. पंजाबराव सातंगे हे कारंजा येथील उपविभागीय कार्यालयात हेड क्लर्क म्हणून नोकरी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here