दोन ॲम्बुलन्स व ५० बेड साठी आ. राम पाटील रातोळीकर यांच्याकडून ४० लाखाचा निधी…

महेंद्र गायकवाड
नांदेड
करोना वायरस मुळे नागरिक भयभीत झाले असून शासन अनेक उपाययोजना राबवत आहेत नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता व करोना वायरस वर प्रभावी उपाययोजना राबविल्या जाव्यात या हेतूने दोन ॲम्बुलन्स व 50 बेड खरेदी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आ.राम पाटील रातोळीकर यांनी चाळीस लाख रुपयांच्या निधीची मदत शासनाकडे पत्र देऊन जाहीर केली आहे

करोना (कोवीड 19 )वायरस मुळे जनजीवन प्रभावित झाले आहे नागरिकांना याकाळात चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे व करोना वायरस वर प्रभावी आरोग्यसुविधा मिळण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीचे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम 2020- 21 अंतर्गत ग्रामीण रुग्णालय नायगाव याठिकाणी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी तसेच ग्रामीण रुग्णालय नायगाव करिता 50 बेड आय स्टॅन्ड उपलब्ध करून देण्याकरिता तसेच ग्रामीण रुग्णालय बिलोली

याठिकाणी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी अशा एकूण तीन कामासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत चाळीस लाख रुपये निधी मदत त् जाहीर केली आहे त्यासंदर्भातील पत्र जिल्हा प्रशासनाला आमदार राम पाटील रातोळीकर यांनी दिले आहे

त्यामुळे नायगाव, बिलोली या तालुक्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत शासन करोना व्हायरस संदर्भात अनेक उपायोजना राबवत असताना हा 40 लाख रुपयांच्या निधीची मोठी मदत होणार आहे तसेच करोना वायरस वर प्रतिबंध करण्याच्या उपाय योजनेला रातोळीकर यांच्या निधीमुळे चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here