देशात ७२२ केरळमध्ये सर्वाधिक १३७ तर महाराष्ट्र १२५…आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्याकडे केली ही मागणी…वाचा

डेस्क न्यूज : भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या ७२२ वर गेली आहे. कोरोनामध्ये ६५६ सक्रिय रुग्ण आहेत. देशात या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत ५० लोक बरे झाले आहेत तर १६ जणांचा मृत्यू शेवटचे तीन मृत्यू गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात झाले. राज्यनिहाय आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर केरळमध्ये सर्वाधिक १३७ प्रकरणे आढळली आहेत तर महाराष्ट्र १२५ प्रकरणांपैकी दुसर्‍या क्रमांकावर आहे.

आकडेवारीनुसार महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात दोन लोकांचा मृत्यू. त्याच वेळी मध्य प्रदेश, तामिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला. देशातील २७ राज्ये सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या चक्रात आहेत.

कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशांतील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची मागणी केली.

राज्यात कोरोनाला प्रतिबंधासाठी केंद्राच्या सूचनेनुसार कार्यवाही केली जात आहे. राज्यात आतापर्यंत १८ कोरोनाबाधीतांना घरी देखील सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आणि आरोग्य विभागाच्या कामगिरीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

अत्यावश्यक वैद्यकीय संसाधने जशी एन ९५ मास्क, ट्रीपल लेअर मास्क, पीपीई, व्हेटीलेटर याची आवश्यक ती उपलब्धता राज्यात आहे. मात्र आपात्कालीन परिस्थिती ओढावल्यास भविष्यकालीन तरतूद म्हणून या अत्यावश्यक वैद्यकीय साधनासामुग्रीची पूर्तता केंद्र शासनाने करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे .

कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील धुळे, अकोला, औंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर या ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here