चिमुर सुनिल कोडापे.
देशात कोरोना या आजाराने थैमान घातले असून उपाययोजने करिता केंद्र सरकारने 15 एप्रिलपर्यंत लाँकडाऊनचे आदेश दिले आहे. या सोबतच शासकीय कार्यालयाचे कर्मचाऱ्यांची टक्केवारी सुद्धा कमी केलेली आहे. एवढे करून सुद्धा शंकरपुर आणि कीटाडी सर्कलचा अंगणवाडी पर्यवेक्षिका राठोड यांनी 45 अंगनवाडी सेविकांची सभा घेऊन शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
याबाबत सविस्तर व्रूत्त असे की राठोड यांच्याकडे शंकरपुर व किटाडी हे दोन सर्कल आहेत या दोन सर्कलमध्ये कमीत कमी 45 ते 50 अंगणवाड्या आहेत, त्या सर्व अंगणवाडी सेविकांना घेऊन शंकरपूर येथील वार्ड क्रमांक 2 मधील अंगणवाडी क्रमांक 5 मध्ये 45 ते 50 अंगणवाडी सेविकांचे अहवाल सभेचे आयोजन करण्यात आले, त्यात कोणतेही शासनाची नियमांचे पालन केल्याचे दिसून आले नाही.
जगभरात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे व रुग्णांची संख्या वाढत असुन शासन दररोज नवीन नवीन उपयोजना व कठोर नियम लागू करत असतानासुद्धा शंकरपूर येथील प्रर्यवेक्षीका राठोड यांनी ही सभा घेऊन शासनाच्या नियमांला पायाखाली तुडविल्याचे स्पष्ट चित्र दिसुन येत आहे.
एकिकडे अंगणवाडी सेविकांना विविध माध्यमातून किंवा शिबिराच्या माध्यमातून स्वच्छतेचे धडे दिले जातात. यातून बोध घेत अंगणवाडी सेविका स्वतः घरोघरी जाऊन स्वच्छतेचे धडे देताना दिसतात, पण परिवेक्षिका राठोड यांनी 45 तें 50 सेविकेची सभा घेतलीयांत त्यांनी कोणतीही नियम पाळल्याचे दिसून आले नाही. ना कोणतीही सोशल डीस्टन, ना हात धुण्याकरीता पाणी, साबुन, ना सानीटायझर मग दुसऱ्यांना स्वच्छतेचे धडे देणारी याबाबत अनभिज्ञ कसे असा प्रश्न येथिल जनतेला पडलेला आहे व यावर
वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
याबाबत महीला बाल विकास प्रकल्प अधिकारी गेडाम यांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.