देशातील १४ राज्यात तबलीगी जमातशी संबंधित कोरोनाचे ६४७ रुग्ण…केंद्रीय आरोग्य मंत्रालय…

डेस्क न्यूज – देशात कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून ही आकडेवारी २३०० च्या पुढे गेली आहे. आतापर्यंत ५६ हून अधिक लोक मरण पावले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, १४ राज्यात तब्लीगी जमात संबंधित ६४७ कोरोना बाधित प्रकरणे समोर आली आहेत. या एका चुकीमुळे बरीच प्रकरणे वाढली आहेत. आता जर अशी चूक झाली तर आपण खूप मागे जाऊ . आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत तबलीगी जमातमुळे कोरोनाची १४७ प्रकरणे १४ राज्यात आढळली आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here