दिव्यांग बालीकेवर दोन नराधमांनी केला अतिप्रसंग…मूर्तिजापूर शहरातील घटना…एकास अटक…दुसरा फरार

मूर्तिजापूर : जन्मजात वाचा हरवलेल्या मुक्या असलेल्या १६ वर्षीय बालीकेवर अतिप्रसंग केल्याची घटना ६ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली . पिडीत बालीकेने सांकेतिक भाषेत झाला प्रकार घरातील वडीलधऱ्यांसमोर कथन केला.

मुर्तीजापुर येथील भिमनगर भागात राहणारे राजेश वानखडे (३०) व गौरव भगत (२५) यांनी संगनमत करुन एका १६ वर्षीय दिव्यांग बालीकेला ती जन्मजात मूकी असल्याचा असल्याचा फायदा घेऊन तिला फुस लावून जवळच असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मुतारीत नेऊन राजेश वानखडे याने अतिप्रसंग केला.

तिने घडलेली आपबीती सांकेतिक भाषेत आईजवळ कथन केली. या संदर्भात पिडीतेच्या आईने शहर पोलीसात संध्याकाळी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून आरोपी गौरव भगत ३० याला अटक करण्यात आली आहे तर त्याचा दुसरा साथीदार राजेश वानखडे हा पसार झाला आहे.या प्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here