महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड येथील ओंकार केटर्सचे मालक दिलीप झंवर यांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबवित शहरातील नागरिकांसाठी मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली असून लोकांना जेवण कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राजेंद्रकुमार झंवर यांनी दिली आहे. झंवर कुटुंब नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असल्याने झंवर कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील प्रसिद्ध असलेले ओंकार केटर्सच्या वतीने 28 मार्च ते 14 एप्रिल पर्यन्त नवा मोंढा येथील एस, बी. आय.बँके समोर दररोज 12 ते 2 च्या दरम्यान मोफत जेवण दिले जाणार असल्याची माहीती आयोजक दिलीप झंवर व राजेंद्रकुमार झंवर यांनी दिली आहे.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लॉक डाऊन झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका गोरगरीब जनतेला व मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या गरीब व्यक्तींना बसला आहे.त्यांना वेळेवर जेवण्याची सुविधा मिळत नाही त्यामुळे गोरगरीब जनतेला मोफत जेवण सेवेचा फायदा होणार आहे. दरम्यान या मोफत जेवण सेवेत जेवण कमी पडू देणार नाही अशी ग्वाही झंवर बंधूनी दिली आहे.झंवर कुटुंबियांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.