थर्मल सेन्सर मशीन अभावी सुरू होती कर्मचारी आणि पाल्यांची तपासणी कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर झाली सुरळीत तपासणी…

भंडारा : जवाहरनगर आयुध निर्मनीच्या दवाखान्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एका पथकाच्या वतीने कर्मचारी आणि त्यांच्या पाल्याची तपासणी शिबीर रविवारला घेतले. मात्र, तिथे थर्मल सेन्सर मशीनच्या माध्यमातून तपासणी न करता केवळ नाव नोंदणी करून हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येत होता. यावर आयुध निर्माणी कर्मचारी संघाचे कार्यसमिति सहसचिव योगेश झंझाड आणि जेसीएफ चार वर्क्स कमिटीचे सदस्य श्रीकांत इंगळे यांनी आक्षेप घेतल्यानंतर योग्य प्रकारे सर्वांची तपासणी करण्यात आली.

◆ कोराना या विषाणूच्या विळख्यात देशातील नागरिक सापडला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविता यावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. यामुळे नोकरी, शिक्षण किंवा अन्य कामानिमित्त गावाबाहेर असलेल्या व्यक्तींचे आता गावात आगमन होत आहे. अशा व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी शिबीर जवाहरनगर आयुध निर्माणी दवाखान्यात रविवारला जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका वैद्यकीय पथकाने केली.

◆ मात्र, बाहेरून आलेल्या कर्मचारी व त्यांच्या पाल्यांची नोंदणी करून थर्मल सेन्सर मशीन अभावी शरीरातील तापमानाची तपासणी न करताच हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्याचा प्रकार सुरू होता. ही बाब माहीत होताच आयुध निर्माणी कर्मचारी संघाचे कार्यसमिति सहसचिव योगेश झंझाड आणि जेसीएफ चार वर्क्स कमिटीचे सदस्य श्रीकांत इंगळे यांनी थर्मल सेन्सर मशीनने तपासणी करावी, अशी मागणी करून तापसणीवर आक्षेप घेतला. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना थर्मल सेन्सर माशीनबाबत विचारणा केली. त्यावर सदर वैद्यकीय महिला अधिकाऱ्याने त्यांच्याकडे थर्मल सेन्सर मशीन नसल्याची गंभीर बाब सांगितली.

◆ मशीन अभावी कोरोनाबाबत तपासणीचे निदान पूर्ण होणार नसल्याची गंभीर बाब योगेश झंझाड आणि श्रीकांत इंगळे यांनी वैद्यकीय पथकाच्या लक्षात आणून देत त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. मात्र, त्यांच्याकडे थर्मल सेन्सर मशीन नसल्याने या वैद्यकीय पथकाला आयुध निर्माणीच्या रुग्णालयातील थर्मल सेन्सर मशीन दिली. त्यानंतर उपस्थित कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या शरीरातील तापाची मोजणी करून नोंदणी करण्यात आली. कर्मचारी संघाचे पदाधिकारी झंझाड आणि इंगळे यांनी लागलीच आक्षेप घेतला नसता, तर थर्मल सेन्सर मशीनअभावी होणारी तपासणी कितपत योग्य झाली असती, अशी चर्चा आता आयुध निर्माणी वसाहतीत सुरू आहे.

◆ आयुध निर्मनीतील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच आरोग्य विभागाच्या पथकानेही योग्य पद्धतीनेच तापसनी करावी, असे योगेश झंझाड, श्रीकांत इंगळे आणि रविकांत अहिरवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here