डेस्क युज – देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्वच दुकाने बंद आहेत. मद्यपी शौकानासाठी बार,दारू दुकाने बंद झाल्याने मोठी पंचाईत झाली तर अनेक ठिकाणी बार,दारूचे दुकाने फोडल्याच्या बातमी बघितल्यात.
दरम्यान तामिळनाडूमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. येथे दारू न मिळाल्यामुळे तीन जणांनी पेंट वार्निश प्यायला लावला. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे देशभरात दारूची दुकाने बंद आहेत.
शिवशंकर, प्रदीप आणि शिवरामन यांना रविवारी तामिळनाडूच्या चेंगसपटुमध्ये दाखल करण्यात आले. तिघेही पकिंग करत होते. हे तिघेही दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येत आहे. दारू उपलब्ध नसताना तिघांनी वार्निश प्याले. तिघेही मरण पावले आहेत.