तेल्हारा – पुरुषोत्तम ऊर्फ नाना इंगोले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सम्पूर्ण देशभर २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु कोणाचीही गैरसोय होऊ नये ह्या करिता अत्यावश्यक सेवा काही काळा करिता सुरू ठेवण्याचे आदेश दिले. सर्वत्र जिल्हाबंदी सुद्धा आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू नये म्हणून शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या संदर्भात केंद्र शासनाने विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
यानुसार किराणा दुकाने तसेच औषधी दुकाने लॉकडाऊनच्या काळात सेवा देतील असे जाहीर झाले आहे. जीवनावश्यक वस्तु अधिनियम तरतुदीनुसार अन्नधान्य तसेच औषधे यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आलेला आहे. अन्नधान्याची विक्री किराणा दुकानांमधून होत असतानाच काही लालची लोकांनी याचा गैर फायदा घेत असल्याचे सोशल मीडियावर तसेच वृत्त पत्रात वर चर्चा होताना दिसत आहे.
याचीच भनक तेल्हारा पुरवठा निरीक्षक निलेश कात्रे यांना लागली व आज दि 5 एप्रिल2020 रोजी यांना एका ग्राहकाने 157 रु छापील किंमतीचे तेलाचे पाकीट 170 रु मध्ये अरुण किराणा वर विकत असल्याचे सांगितले व पुरवठा निरीक्षक हे आपल्या सहकाऱ्यांसह सदर दुकान वर गेले असता सदर हकीकत सत्य असल्याचे निदर्शनास आले.
या दुकानात एकूण 10 इसम हजर होते त्यामध्ये सुरेश चिमनलाल भायानी 65 , सचिन सुरेश भायानी 30, अंकित सुरेश भायानी , चांदमल मापावत 66, पवन दुतोंडे 19, विशाल उजाळ 33, अजिंक्य फोकमारे 19, अनिल बाहकर 43, प्रकाश कदम 43, अमर दुतोंडे 27 यांच्या विरोधात पोलीस स्टेशन तेल्हारा येथे फिर्याद दाखल केली त्यानुसार कलम 3,7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 सह कलम 188 भा दं वि ,आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 53 प्रमाणे ,साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 3 प्रमाणे कायदेशीर फिर्याद नोंदवली आहे वरील सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
शासनाच्या आदेशानुसार कोणीही जास्त भावाने विक्री करू नये असे ठणकावले आहे व सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार किराणा दुकानांच्या बाबतीत पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक व त्यावरील अधिकारी आणि पोलीस तसेच औषध दुकानांच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक व त्यावरील अधिकारी आणि पोलीसांना देण्यात आले आहेत.