तेल्हारा वासीयांनी लॉक डाऊन चे पालन करत घरा घरात साजरा केला राम जन्मोत्सव…

तेल्हारा – पुरुषोत्तम उर्फ नाना इंगोले

तेल्हारा येथील राम नवमी उत्सव हा दरवर्षी खूप मोठ्या उत्साहाने साजरा होतो तेल्हारा नगरी अवघी राम नामाने दुमदुमलेली असते याच नगरीत गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला अखंड राम जप , तेथे येणारे हजारो भाविक भक्तासाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन डोळ्याचे पारणे फेडणारा तो क्षण मात्र आज कोरोना महामारी मुळे हरवून गेला.

सालाबादप्रमाणे रामनवमी उत्सव समिती तर्फे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते मात्र या वर्षी देशावर असलेल्या संकटावर मात करण्यासाठी सर्व शहर वाशियांनी आपल्या दारात रांगोळ्या काढून, दीपप्रज्वलन केले, रांगोळ्या मध्ये कोरोना बद्दल जनजागृती करण्याचे काम केले व या संकटातून अवघ्या जगाला तरण्याचे साखळे प्रभू श्रीरामास घातले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here