तेल्हारा तालुक्यातील ग्राम पाथर्डी प्रवेश बंद…

तेल्हारा तालुका प्रतिनिधी- पुरुषोत्तम उर्फ नाना इंगोले

आज सम्पूर्ण देशात कोरोना महामारीचे संकटात असून अकोला जिल्ह्यात आज तारखे पर्यंत तरी एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही व यापुढेही होऊ नये ह्या करिता शासन स्तरावर प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे.

यात जिल्ह्यातील डॉक्टर, पोलीस बांधव, ब्यांक कर्मचारी महावितरण, सेवाभावी संस्था , पत्रकार महसूल विभाग असे अनेक लोकं म्हटल्यापेक्षा देवदूत अहोरात्र निस्वार्थ सेवा करत आहेत यांचे कार्य सफल व्हावे या करिता ग्राम पंचायत स्तरावर जागरूकता दाखवत

पाथर्डी ह्या गावचे सरपंच डॉक्टर वसो यांनी आपल्या गावात दारु,मांस,तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घातली आहे तसेच गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली गावातील रस्त्यावर असलेले शेण खताची विल्हेवाट लावून गावात जन्तु नाशक फवारण्या केल्या .

सरपंच हे दिवसा व रात्री सुद्धा गावात फेरफटका मारत असतात व सरपंच स्वतः डॉक्टर असल्यामुळे ते गावातील लोकांना कोरोना बद्दल जनजागृती करत आहेत तसेच पुणा- मुंबई वरून आलेल्या सर्व नागरिकांना डॉक्टर च्या सल्ल्यानुसार आप आपल्या घरात ठेऊन बाहेर जाण्यास मनाई केली आहे.

बाहेर गावातील व्यक्तींना गावात प्रवेश नाकारण्यात येत आहे . गावात यायचे असल्यास प्रथम तपासणी करावी व नंतरच गावात प्रवेश मिळेल असे सरपंच डॉ गजेंद्र वसो यांनी महाव्हाईस प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here