तुमच्या आमच्या सर्वांच्या सुरक्षतेची उभारा गुडी…सौ प्रगती पाटील

नागपूर – गुडी पाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. पण या वर्षी संपूर्ण जगावर खूप मोठे कोरोना संकट आले आहे. देशात , महाराष्ट्रात कोरोना चे रुग्ण वाढत आहे . कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. केंद्र व महाराष्ट्र शासन अतिशय उत्तमरीतीने काम करीत आहे. आरोग्य विभाग या आजाराला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.गुडी म्हणजे आपली प्रतिमा , विजयाची प्रतिमा – जिला साडी परिधान केली जाते.

ज्या मार्फत आपण आपली संस्कृती आपली सुरक्षा करतो. कडू निंबाची पाने , फुलांचा हार , गाठी घालून गुंडीला सुशोभित करतो. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या नियमाने आपण सुशोभित होणार आहोत. आपली सुरक्षा आपल्यालाच करायची आहे. आज आपण सर्वजण एकादृढनिर्णय करूया कि *` मी बाहेर जाणार नाही ` ` मी कोरोना बाधित होणार नाही` आणि `दुसऱ्याला सुद्धा बाधित करणार नाही आजची गुढी कोरोनाला हरविण्यात नक्कीच यशस्वी होणार. प्रशासनाच्या सूचनांना आपण पाळावे हीच कळकळीची विनंती …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here