डॉ. हेडगेवार सेवा समिती तथा एकल विद्यालय तर्फे गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

अहेरी:

देशात सुरु असलेल्या ‘लाॅकडाउन’ मुळे गावागावात संचारबंदी असल्यामुळे परिणामी सर्व कामे ठप्प पडल्याने मजुरी च्या भरवशावर असणारे कुटुंब अडचणीत सापडले आहेत अशातच डाॅ. हेडगेवार सेवा समिती तथा एकल विद्यालय संच लगाम द्वारा अहेरी तालुक्यातील बोरी व राजपुर पॅच या परिसरातील गरजू व गरीब कुटुंबातील नागरीकांना उपासमारीची पाळी येऊ नये या दृष्टीकोनातून

बोरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नितीन गुंडावार, श्री राकेश नांबियार, संतोष बोमकंटीवार, योगेश कोलपाकवार, बोरी ग्रामपंचायतीचे सचिव ईश्वर दर्रों वनरक्षक गायकवाड श्री अमोल उराडे यांच्या हस्ते येथील गरीब व गरजू कुटुंबीयांना जिवनावश्यक वस्तू (तांदूळ, दाळ, तेल, साखर, चायपत्ती, तिखट, मीठ, हळद, साबन) इत्यादी 10 दिवस पुरेल एवढे अन्नधान्य वाटप करण्यात आले.

तसेच कोरोना या महाभयंकर बिमारी पासून स्वताचे बचाव कसे करायचे याबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी श्री नरेश शेंडे, श्री नरेश गड्डमवार, श्री श्री साईबाबा सदनपवार श्री स्वप्नील गुंडावर, श्री विनोद सदनपवार श्री सुरेश गंगाधरीवार तसेच अखिल कोलपाकवार यांनी गरजु व गरीब कुटुंबातील नागरीकांना अन्नधान्य वितरणाची घरपोच सेवा दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here