बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. संपूर्ण लॉक डाऊन असून ही संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहेत
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आई हॉस्पिटल मध्ये असताना देखील ते काम करत आहेत हे आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. आपले डॉक्टर नर्स अहोरात्र कष्ट करून करोना पेशंटची काळजी घेत आहेत. डॉक्टर नर्स, वॉर्ड बॉय यांना देखील कुटुंब आहे.
कोरोना संक्रमीत व्यक्तीकडून डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची भीती अधिक असते. यावर नागपूरच्या डॉ. समीर अरबट यांनी ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया सोपी करण्यासाठी सेफ्टी बॉक्स तयार केला आहे. यामुळे बाधित रुग्णाकडून उपचार करणाऱ्यांना होणारा संक्रमणाचा धोका कमी करता येतो.
कोरोना बाधित रुग्णाच्या शिंकेमुळे किंवा खोकल्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक असतो. हा धोका कमी करण्यासाठी सेफ्टी बॉक्समध्ये ऑपरेटर अपरेचर लावण्यात आलं आहे. याला प्लास्टिक शीट व्हॉल्वने कव्हर केलं आहे. याला उघडता आणि बंद करता येतं. यात एक छिद्र सुद्धा आहे. यामुळं कोरोना बाधित रुग्णाची श्वशन प्रकिया थांबली तरी ते काम करते.