बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई | कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे नागरिकांचं घरबसल्या मनोरंजन व्हावं, यासाठी केंद्र सरकारने गाजलेली रामायण, महाभारत मालिकेचं प्रक्षेपण पुन्हा सुरू केलं आहे. त्याच धर्तीवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका स्वराज्यरक्षक संभाजी ही देखील पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शिवप्रेमी आणि शंभूप्रेमींनी व
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारने जसा रामायण, महाभारत दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील पुन्हा स्वराज्यरक्षक संभाजी मालिका दाखवावी. तसं वाहिनीशी बोलणं करावं, असं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं.
त्यांच्या मागणीनुसार आता ही मालिका 30 मार्चपासून पुन्हा दाखवण्यात येणार आहे.
30 मार्चपासून दुपारी 4 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मालिकेचं प्रक्षेपण होणार आहे. झी मराठीवर ही मालिका दाखवण्यात येणार आहे.
वाहिनीच्या या निर्णयाने शंभूप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा शंभूमहाराजांचा ओजस्वी इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकाने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र आता कोरोनाने ओढावलेल्या परिस्थितीमुळे आणि लॉकडाऊनमुळे मालिका पाहण्याची संधी प्रेक्षकांना पुन्हा मिळणार आहे.