जीवनाश्यक वस्तुसह इतर सर्व वस्तुंच्या वाहतुकीस परवानगी..जिल्हाधिकारी दीपक सिंगला…मात्र मानवी वाहतूकीस निर्बंध

गडचिरोली, (जिमाक)दि.26: करोना विषाणूचा (COVID-१९) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध उपाययोजनाचा एक भाग म्हणून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. सदर निर्बध काही प्रमाणात शिथील करणे आवश्यक असल्याची परिस्थीती सद्या निर्माण झाली आहे. त्याअर्थी, जिल्हाधिकारी गडचिरोली यांना प्राप्त झालेल्या अधिकारानूसार व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये अधिकाराचा वापर करुन खालील प्रमाणे अंश:ता सुधारणा करण्यात येत आहे.

१) गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण क्षेत्रात जिवनाश्यक वस्तुसह इतर सर्व वस्तुंची वाहतुक करणाऱ्या सर्व प्रकारचे वाहतुकीस नेहमी प्रमाणे परवानगी असेल. मात्र, हया मालवाहतुक करणाऱ्या वाहनातुन मानवी वाहतुकीस प्रतिबंध असेल

२) एसटी महामंडळाच्या बसेस व खाजगी बसेस, एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. चालका व्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तींसाठी टॅक्सी तर एका प्रवाशासह ऑटोरिक्षा वाहतुक करता येईल, खाजगी वाहन, वाहतुकीस वाहनचालकांव्यतिरिक्त एका व्यक्तीला उपयोगात आणता येईल

३) वाहनांचे चालक व वाहक यांचे भोजन व्यवस्थेकरीता योग्य ढाब्यावर प्रत्यक्ष जेवन न देता पार्सलद्वारे भोजन व्यवस्थाबाबत तहसिलदार यांनी उपाययोजना करावी अशा सूचना देणेत आल्या आहेत. तसेच शिवभोजन देणाऱ्या संस्थेनी एका टेबलवर एक व्यक्ती याप्रमाणे बसण्याची व्यवस्था करून हॉटेल सुरू ठेवावे. मात्र या व्यतीरीक्त बाकी सर्व हॉटेल बंद राहतील

४) यापुर्वी, निर्गमित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशातील अटी व शर्ती/निर्देश कायम राहतील याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली दीपक सिंगला आवाहन केले आहे.

करोना विषाणू संसर्गाबाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती
दि: २६ मार्च २०२० दु.४.००

▪एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- ००
▪आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन -३६
▪क्वारंटाईन कालावधी पूर्ण – २३
▪अजून निरीक्षणाखाली असलेले – १३
▪पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -००
▪घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -१३
▪आज तपासणीसाठी नमुने घेतले- ००
▪एकुण नमुने तपासणी- ०९
▪पैकी निगेटीव्ह – ०९
▪नमुने तपासणी अहवाल बाकी-००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here