जिल्ह्यातील आरोग्याच्या सुविधांचा अभाव तात्काळ दूर करण्यात यावा…राजु झोडे

कोरोना च्या धर्तीवर जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्यसुविधा पूर्ण करण्यासाठी राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना या महाभयंकर विषाणूशी लढण्यासाठी जनता व प्रशासन सज्ज आहे. परंतु आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक त्या सुविधांचा अभाव जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दिसून येत आहे.

प्रशासकीय स्तरावरून चंद्रपूर जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, सरकारी दवाखाना याठिकाणी बेडची व्यवस्था केली आहे. परंतु व्हेंटिलेटर हे फार कमी प्रमाणात आहेत. समजा कोरोना च्या पेशंटची वाढ झाली तर व्हेंटिलेटर ची मोठ्या प्रमाणात आवश्यकता लागेल त्याची व्यवस्था करण्यात यावी. औषधांचा साठा ग्रामीण व शहरी रुग्णालयांमध्ये मुबलक ठेवण्यात यावा.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना चाचणी हे मोफत करून चंद्रपूर जिल्ह्यातच याची चाचणी व्हावी अशी व्यवस्था करावी. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे मास्क व कीट ची कमतरता असून जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांना मास्क, सेनिटायझर, किट ची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक त्या सुविधांचा अभाव दिसून येत आहे त्या तात्काळ दूर कराव्या.

कोरोना या महाभयंकर विषाणूशी लढण्याकरिता जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था व आरोग्याच्या सोयीसुविधा याकडे अधिक लक्ष देऊन त्या तात्काळ दूर कराव्या. त्याचप्रमाणे कोरोना च्या लढाईत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी व सरकारी कर्मचारी हे सुद्धा आपल्या कुटुंबाची व जिवाची पर्वा न करता महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यांनाही ५० लाखांचा विमा देण्यात यावा.

अशा विविध मूलभूत मागण्यांना घेऊन उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांनी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांना निवेदन देऊन तात्काळ वरील सर्व मागण्या पूर्ण कराव्या असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here