जिल्हाधिकारी जळगांव यांच्या आदेशाने जमावबंदी,संचारबंदी १५ एप्रिलपर्यंत कायम…भडगांव पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांचे संचारबंदी बाबत जनतेला आवाहन…

भडगांव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हयात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 31 मार्च, 2020 पर्यंत जमावबंदी, संचारबंदी आदेश देण्यात आले होते तेच आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दि. १५ एप्रिल च्या मध्यरात्री प्रयन्त कायम ठेवण्यात आले आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13.3.2020 पासुन लागु करुन खंड 1, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. जळगाव जिल्हयात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक

उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 31 मार्च, 2020 पर्यंत सीमा बंदी लागू करण्यात आली होती. शासनाने 15 एप्रिल, 2020 पर्यंत संपुर्ण राज्यात बंदी (Lockdown) लागु करण्यात आली असल्याने तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता व त्यात वाढ होऊ नये म्हणून दिनांक 23 मार्च, 2020 ला संचारबंदी केलेली होती.

ती 15 एप्रिल, 2020 च्या रात्री एक वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
त्या आदेशान्वये

आज दि. २ एप्रिल रोजी भडगांव पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी संचारबंदी संदर्भात जनतेला आवाहन केले की दि.१५ एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी जमावबंदी लागु असल्याने कोणीही घराबाहेर पडु नये तसेच ग्रामीण भागातील पोलिस पाटील यांनी दंवडी देऊन कळवण्यात आले. अत्यावश्यक सेवा साठी कोणीही जास्त गर्दी करू नये. असे सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here