जितेंद्र आव्हाड यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड…

बाळू राऊत प्रतिनिधी

मुंबई, दि. 31 : दिलीप वळसे-पाटील यांनी कामगार व राज्य उत्पादन शुल्क ही दोन्ही महत्त्वाची खाती सांभाळत असताना कामाच्या वाढत्या व्यापामुळे सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरून मुक्त करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. ही माहिती स्वतः वळसे-पाटील यांनी प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या निवेदनातून दिली आहे.

शासनाच्या 8 जानेवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयात अंशतः बदल करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र सतीश आव्हाड यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय राज्यपाल महोदयांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने आज दि. 31 मार्च 2020 रोजी जारी केला आहे

सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पदमुक्त करण्यात आले असून त्यांच्या ऐवजी नवे पालकमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे युध्दपातळीवर प्रयत्न होत असताना मंगळवारी अचानकपणे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे हा राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरला आहे.

कामगारमंत्री या नात्याने सोलापूरकडे आपले सतत लक्ष राहील. सोलापुरात कामगारांची मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने लक्ष देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here