जम्मू-काश्मीर | कुलगाम मध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार…

फोटो -सौजन्य -गुगल

फोटो – सौजन्य गुगल

डेस्क न्यूज – दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना ठार केले. परंतु, मृत्यू झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. यापूर्वी हरदमनगुरीच्या खुर बातपोरा भागात चार दहशतवाद्यांना लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी ३४ राष्ट्रीय रायफल्स (आरआर) यांच्यासह परिसरात शोधमोहीम राबविली. शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा जवानांना दहशतवाद्यांचा सामना करावा लागला, त्यानंतर दोन्ही बाजूंकडून गोळ्या झाडण्यात आल्या. आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याच्या म्हणण्यानुसार येथे चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी येथे दाखल झाले व सर्व बाजूंनी परिसर घेरला. सध्या आणखी एक दहशतवादी लपल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तेच दहशतवादी आहेत, ज्यांनी बुधवारी रात्री उशिरा कुलगाममध्ये दोन नागरिकांना गोळ्या घालून ठार केले. यानंतर परिसरातील सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबविली जात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here