ग्राम पांढरी येथील उद्योगपती विजय अग्रवाल यांनी हैद्राबाद ते गोंदिया रेल्वे मार्गाने पाई जाणाऱ्या ४० नागरिकांना दिले जेवण…जपला माणुसकीचा वसा.

गोंदिया, सडक/अर्जुनी

तालुक्यातील ग्राम गोंगले पांढरी येथील राईस मिलर्स श्री विजय अग्रवाल यांनी माणुसकीचा वसा जपत 40 लोकांना 31 मार्च 2020 रोजी जेवण दिले, तर यापूर्वी त्यांनी या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांची मदत करून जेवणाची वेवस्था केली आहे, 31 मार्च रोजी हेद्राबाद वरून गोंदिया मध्यप्रदेश कडे रेल्वे मार्गाने जवळपास 40 लोकांचा झुंड पायदळ पट्री पट्री हातात घट्ट पट्टे घेऊन जात होते, त्यात काही माणसं तर काही महिला तर लहान चिमुकली मुले घेऊन पाई पाई जात होते.

या मार्गाने हजारोच्या संख्येत परराज्यात काम करणारे मजूर लोक आपल्या गावाकडे परतले आहेत अश्यात येण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांनी तब्बल 700 किमी अंतर पायदळ तुडविला आहे, तर रात्रीला जवळ असलेले साहित्य झोपण्यासाठी कामात येत असे, अधिक माहिती साठी मजुरांना विचार पूस केली असता त्यांनी सांगितले की आपण 25 तारखेला हेद्राबाद वरून निघालोय आता आज 31 मार्च आहे 2 तारखे पर्यंत आपण घरी पोहोचणार हेद्राबाद ते गोंदिया येतान्हा पोलीस विभागाने व काही समाजातील नागरिकांनी जेवणाची वेवस्था केल्याने तेवढी वेवस्था झाली मात्र पाई चालून चालून हाल झाले.

गेली 6 ते 7 दिवसाचा सफर खूप त्रास दाई झाल्याचे त्यांनी सांगितले, कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन 22 तारखेपासून चालू आहे त्या अनुसंघाने गरीब व मजुरी करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत, अश्यात समाज सेवकांच्या भूमिकेत विजय अग्रवाल यांनी सुद्धा माणुसकीचा वसा जपत गरीब व गरजू नागरिकांची मदत करीत जेवणाची वेवस्था केली.

तर त्या मार्गाने येणाऱ्या सर्वांनाच आपण जेवण देऊ अशी माहिती अग्रवाल यांनी दिली यापूर्वी सुद्धा अग्रवाल यांनी अनेकठिकानी मदत करून समाज सेवेत आपली मोलाची भूमिका कायम ठेवली आहे. ते गोंगले पांढरी छेत्रातील राईस मिलर्स असुन त्यांचे अन्य वेवसाय सुद्धा आहेत ते पांढरी छेत्रातील उधोगपती असुन मदतीचा हात त्यांचा नेहमीच पुढे असतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here