ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र हिवराबाजार यांनी संयुक्तरीत्या गावोगावी फिरून केली जनजागृती…

शरद नागदेवे

रामटेक- हिवरा बाजार -जगभरात कोरोणा विषाणूचे थैमान घातले आहे.त्यामुळे वैश्विक स्तरावर आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.देशातही अनेक ठिकाणी कोरोना ग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.स्थानिक स्तरावर कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी शासनातर्फे विशेष उपाययोजना केली जात आहे.ग्रामीण क्षेत्रामध्ये सुध्दा लोक कोरोनो विषाणूपासून सजग राहण्यासाठी जिल्हा परिषद नागपूर आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत गावोगावी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी लोकांना सजग करण्यात येत आहे.

आज दि.१९/३/२०२० रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवराबाजार व हिवरा बाजार ग्रामपंचायत संयुक्तरीत्या अॅम्बुलन्स गाडी द्वारे त्यांचा परिक्षेत्रात गावोगावी जाऊन कोरोना विषाणूंचा संसर्गचा पासून सजग राहण्याबाबतची माहिती दिली.

निश्चिंत रहा,घाबरु नका….
कोरोनो विषाणू हा संसर्ग ड्रोपलेट च्या माध्यमातून पसरतो, म्हणून सतर्कता बाळगा, शिंकतांना,खोकलतांना तोंडावर रुमाल ठेवने,नेहमी हात स्वच्छ धुणे,चेहऱ्यावर व आजुबाजुला वारंवार हात लावू नये,आजारी प्राण्यांन पासून दुर राहणे,सर्दी खोकला असणाऱ्या रुग्णांनपासून ३ फुट अंतर असावे, अन्न पूर्णपणे शिजवलेले खावे, हस्तांदोलन न करता नमस्कार घ्यावा.गर्दीचा ठिकाणी जाणे टाळावे.सर्दी,कोरडा खोकला,ताप,श्र्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असल्यास आरोग्य केंद्रात दाखवावे असे आव्हान प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवराबाजार डॉ.प्राजक्ता गुप्ता यांनी परिसरातील लोकांना केले.

प्राधमिक आरोग्य केंद्रा अतर्गंत येणाऱ्या सगळ्या उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र हिवराबाजार बाजार येथे प्रशिक्षण देतांना कोरोना विषाणू संसर्ग माहिती व उपाययोजना याबद्दल डॉ.प्राजक्ता गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिती गेडाम,डॉ.प्रकाश गणवीर, आरोग्य साह्यक माधव धुर्वे,सिमा देवळेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here