गोंडवाना विद्यापीठाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा केल्या स्थगित…संचालक डाॅ. अनिल चिताडे यांची माहिती

गडचिरोली :27मार्च

कोरोना विषाणूंच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कुलगुरू यांच्या मान्यतेने पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. अनिल चिताडे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिल २०२० पर्यंत कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू केली असल्यामुळे विद्यापीठाच्या ९ एप्रिल २०२० पासून सुरू होणारया सर्व पदवी व पदव्युत्तर विभागाच्या लेखी परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या आहेत.

परीेक्षेचे नवीन वेळापत्रक यथायोग्य कळविण्यात येईल. तसेच १ एप्रिल ते ८ एप्रिल २०२० दरम्यान महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणारया प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा स्थगित करण्यात आलेल्या आहेत याची गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी व संबधितांनी नोंद घ्यावी, असे संचालक डाॅ. अनिल चिताडे यांनी २६ मार्च २०२० च्या पत्रान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here