राळेगाव
तालुक्यातील गुजरी या गावात संचारबंदी चे तंतोतन पालन करीत असतांनाच आपापल्या घरासमोरील नाल्या सफाई, सांड पाण्याची योग्य व्हिल्हेवाट, जन्तुनाशकाची फवारणी आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. गावातील युवक, पोलीस पाटील, ग्राम पंचायत, व नागरिकांनी या करीता पुढाकार घेतला आहे.
विशेष म्हणजे मोबाईल वर सपंर्क साधून स्वछता व कोरोना विषाणूच्या प्रकोपाबाबत जणं जागृती करण्यात येत आहे. जि. प. शाळेत विलनीकरण कक्ष स्थापन करण्यात आला. राज्याच्या इतर जिल्ह्यातून गावात आलेल्या नागरिकांच्या प्रकृतीकडे युवक संघटन विशेष लक्ष देऊन असल्याचे दिसते.