गावातील घरोघरी जाऊन माहिती गोळा करून देणारे क्षत्रिय कर्मचारी यांच्या सुरक्षेचे काय ?…जीव धोक्यात घालून बजावत आहेत कर्तव्य…वाचा

डेस्क न्यूज – राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले असून ग्रामीण भागामध्ये कोरोना सदृश परिस्थीती नियंत्रणा मध्ये आणावयासाठी जनजागृती करणे,बाहेर गावावरुन आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे म्हणजेच

त्या लोकांच्या संपर्कात जाणे,नाव,गाव,पत्ता,कोणत्या गावावरुन आले ,कधी आले,जन्म तारीख,काही लक्षणे आहेत काय ईत्यादी माहिती गोळा करावी लागते.

मात्र या कर्मचार्यांना राज्य शासनाकडून सुरक्षेसाठी कोणतेही किट न दिल्याने आता या कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

म्हणजेच सदर व्यक्तीच्या संपर्कात गावातील पोलिस पाटील,सरपंच,अंगणवाडी सेविका,आशा,आरोग्य कर्मचारी,ग्रामसेवक,तलाठी,कृषिसहाय्यक,मंडळ अधिकारी व पोलिस व ईतरही संबांधित विभागाचेअधिकारी,विस्तार अधिकारी,गट विकास अधिकारी,उपविभागिय अधिकारी,तहसिलदार,मंडळअधिकारी ह्या सर्व अधिकारी व कर्मचारी ह्यांना बाहेरुन आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात यावे लागते.

जर ह्या पैकी एखाद्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात एखादा कर्मचारी किंवा अधिकारी आला तर संपुर्ण यंत्रणा बाधित होईल. त्यामुळे क्षत्रिय कर्मचारी ह्यांना पहिल्यांदा सुरक्षा किट पुरविणे आवश्यक आहे.

तसेच आरोग्य विभागा मार्फत काय उपाय योजना करता येईल याचा विचार करुणच क्षत्रिय कर्मचारी ह्यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेशित करावेत अन्यथा रक्षकच भक्षक होतील कि काय अशी चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here