ग़ामस्थांचा गनिमीकावा “गावबंदी ” करून सुरू केली कोरोनाविरूद्ध लढाई…गडचिरोली-चंद़पूर जिल्ह्यात अनेक गावांत गावबंदी

चंद्रपूर:-(सुनिल बोकडे)

एकीकडे दस्तुरखुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गंभीर आवाहनाला काडीमोड समजून वागणारी मुंबई,पुणा, नाशिककर मंडळी तर दुसरीकडे कोरोना सारख्या भयंकर संसग॔रोगाचे गांभीर्य समजून स्वंयप़ेरणेने गावबंदी करणारी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ग़ामस्थ बघता खरे राष्ट्रप्रेम कुठे? हे सहज ध्यानात येते.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक खेडेगावानी गावांनी स्वपुढाकाराने गावबंदी केली आहे.खरे कौतुक गडचिरोली

जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील दुर्गम आदिवासी बहुल पाडयांचे करायला हवे. इकडे सारे शासनाच्या आवाहनाची वाट बघत असताना तिकडे या आदिवासी बहुल १५ते २० गावांनी साऱ्यांना गावबंदी करून टाकली.कोरोना सारख्या संसर्ग रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपले संरक्षण आपणच करण्याची कला व आदर्श या गावखेडयांकडून शिकण्यासारखे ठरते.
बचावाचा गुरूमंत्र देणाऱ्या या गावखेडयांनी शासनाचे आवाहनास दाद देऊन अन्नधान्याचे संयमाने नियोजन करून,परस्पर विश्र्वासाने गावबंदीचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

या गावबंदी दरम्यान गावातिल जनतेने गावाबाहेर न जाता शासकिय योजनांसाठी यंत्रणेच्या संपर्कात राहणे, गावातील साधनसामग्री चा पुरेपुर वापर करून समस्या सोडवण्याचा सपाटा लावला आहे.तसेही शासनाने अल्पदरात सहजतेने अन्नधान्य

आता गावखेडयात उपलब्ध करून दिले आहे.गावकरी संयमाने कोरोनाविरोधी मोहीम राबविण्यात रमले आहेत.नियोजनबद्ध गावबंदी झाल्याने पोलिस प्रशासनावरचा मोठा ताण कमी होणार आहे.गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील गावबंदी करणाऱ्या गावांमध्ये पटवारी,ग़ामसेवक यांना आवश्यक ता भासल्यास गावकरी निरोप धाडून बोलविता असल्याचे कळते.मात्र दुसरीकडे  पुणे, मुंबई,नाशिक, नागपूर कर शासनाने आवाहनाला अविश्वासाने बघत आहेत.हपापलेपणाने स्वताचे व इतरांचे जिवाची पर्वा न करता घराबाहेर पडत आहेत.पोलिसाचे दंडुके खात आहेत.यात कोरोनाचा संसग॔ वाढण्याची भारी भिती निर्माण झाली आहे. अशा वतनुकीने पोलिस प़शाशनावरील ताण वाढला आहे.ग़ामीण भागातील जनतेची “गावबंदी” कोरोना यह विरोधी लढ्यातील मोठी गनिमी नितीन ठरणार आहे.शहरवासियांनी हा आदर्श पुढे ठेवून कमितकमी आता घराबाहेर निघणे टाळावे ही देशाची व समाजाचीही गरज आहे
हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here