तालुका प्रतिनिधी
चिमूर
सद्या जगभरत कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. या विषाणूजन्य आजाराचा थैमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसाची संचारबंदी जाहीर केली. या मुळे अनेक गरीब, परप्रांतीय मजूरांसह त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ येऊन थोपली आहे.
चिमूर नगपरिषद क्षेत्राच्या हद्दीत विविध सामाजिक उपक्रम राबवीनाऱ्या शिवस्पर्श ठोल-ताशा पथकाच्या सदस्यांनी उपासमारी होणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात देत त्यांना अन्नदान वाटपाचा उपक्रम राबविला.
चिमूर शहरातील अनेक प्रभागात वास्तव्यास असलेल्या बेघर व गरजू कुटूंबीय,गस्तीवरील व पोलीस कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना शुक्रवार व शनिवारी त्यांनी भोजनादन केलं या वेळी दीपक पुंड, विषु अगडे, स्वप्नील सावसाकडे, प्रश्नात देवगडे, प्रमोद रुईकर व इतर सदस्य उपस्थित होते.