गडचिरोली पोलीस दलाकडून नागरिकांसाठी अडचणीत मदतीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना…जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे आवाहन

गडचिरोली – सध्या देशात कोरोना विषाणू (कॉव्हिड – १९) मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे देशात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली येथे कोरोना विषाणू साथीच्या रोगाच्या प्रसारास प्रतिबंधक करण्याकरिता व त्या संदर्भातील उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी सामान्य जनतेस अशा परिस्थितीत मदत व सहकार्य होण्याच्या दृष्टीकोणातून स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापण करण्यात येत आहे. जेणेकरुन सदर नियंत्रण कक्षाशी सामान्य नागरीक संपर्क साधुन त्यांना येत असलेल्या अडचणी सांगू शकतील व त्या अडचणींचा इतर शासकीय विभागाशी समन्वय साधुन अडचणी सोडविण्यास मदत करता येईल. याकरिता स्थापन करण्यात आलेले कोरोना (कोवीड-१९) नियंत्रण कक्ष तीन शीफ्टमध्ये २४ तास कार्यान्वित ठेवणेकरीता ३ पोलीस निरीक्षक, ३ सपोनि/पोउपनि, १५ पाकर्म व मोपवि गडचिरोली येथुन सदर नियंत्रण कक्षाकरिता, वाहने व चालक २४ तास ड्युटीकामी मनुष्यबळ नेमण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज पासून गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे खालील हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात येत असून सामान्य नागरिकाना कोरोना संबंधित कारणाविषयी काही अडचणी असल्यास त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर तत्काळ संपर्क करावे.वरील कोविड-१९ नियंत्रण कक्षातील अधिकारी हे सदर हेल्पलाईनवरील तक्रारीची दखल घेवून तात्काळ प्रतिसाद देतील. पोलीस नियंत्रण कक्ष गडचिरोली यांचे संपर्क क्रमांक – ०७१३२-२२३१४९, ०७१३२-२२३१४२ तसेच व्हॉट्सअप क्रमांक – ९४०५८४८७६७, ९४०५८४८७३७, ९४०५८४९१९७ या संपर्क क्रमांकावर वैद्यकीय सेवेबाबत, अत्यावश्यक वस्तू पुरवठा करण्याच्या सेवाबाबत, संशयित रुग्णाची माहिती देण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here