गडचिरोली जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहन चालकांवर कार्यवाही…

यापुढे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर आणखी कठोर कार्यवाही करण्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री.शैलेश बलकवडे यांचे जिल्हाभरातील पोलीस स्टेशनला आदेश

गडचिरोली:29मार्च

संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर गडचिरोली पोलीस दल कडक कार्यवाही करत आहे.यासाठी जिल्हाभरात ११ ठिकाणी आंतरजिल्हा चेकपोस्ट तर ४ ठिकाणी आंतरराज्य चेकपोस्टची उभारणी गडचिरोली पोलीस दलाने केली आहे.गडचिरोली पोलीस दलाने संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहनांवर कार्यवाही करून त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.तसेच एकूण ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत.तसेच संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हाभरातील विविध पोलीस स्टेशन येथे १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
नागरीकांनी संचारबंदीच्या काळात घरातच थांबून कोविड १९ रोगाचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले असताना देखील काही बेजबाबदार नागरिक केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांवर गडचिरोली पोलीस दल कडक कार्यवाही करत आहेत.तरी नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नागरिकांना केले असून यापुढे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकां विरोधात कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here