गडचिरोली जिल्ह्यातील २७ जणांचा क्वारंटाईन कालावधी झाला पूर्ण…१६ व्यक्ती निरीक्षणाखाली…

फाईल फोटो

गडचिरोली : 29मार्च

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ४३ जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी २७ जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील अजून १६ व्यक्ती निरीक्षणाखाली आहेत. यापैकी ६ जण दवाखान्यातील क्वारंटाईनमध्ये तर १० जण घरीच क्वारंटाईनमध्ये आहेत. आज, २९ मार्च रोजी ५ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. आजपर्यंत एकूण १६ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी ११ जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून आणखी ५ नमुन्यांचा अहवाल यायचा असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरून आलेले १२ हजार ६१४ व्यक्ती असून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहे. कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी व लोकांशी संपर्क साधणे टाळावे. संचारबंदी आदेशाचे पालन करून शासन व प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून आलेल्या व्यक्तींनी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here