महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या खासदार निधीतून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 1 कोटीचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्याची घोषणा खा. चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
देशात व राज्यात कोरोना रोगाने थैमान घातले असून देशात सर्वत्र लॉक डाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले त्यामुळे अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाशी सामना करण्यास संवेदनशील आहेत.
तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीला 1 कोटीच्या निधीशिवाय भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशाने माझ्या खासदाराच्या पगारातून 1 लाख पंतप्रधान साहय्यता निधी देण्यात आल्याचेही खा. चिखलीकर यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भाजपाचे नेते देवेंद्र फडणविस यांच्या आवाहनानुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 25 हजार रोख प्रदेश भाजपाकडे दिला आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विनंतीला प्रतिसाद देत 15 तारखे पर्यन्त घरात राहावे व जिल्ह्यातील जनतेने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन खा.चिखलीकर यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण साले व मिलिंद देशमुख ,चिखलीकर मित्रमंडळाचे प्रवक्ते प्रल्हाद उमाटे हे उपस्थित होते.